तुळजापुर : कुमार नाईकवाडी
तुळजापूर तालुक्यातील शिराढोण रस्त्याच्या कडेला गेल्या चार ते पाच दिवसा पासून एक अनोळखी महिला बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती. बरेच दिवस अन्न पाण्याविना भटकत होती. बुधवार दि.३ जुन रोजी गावातील काही नागरिकांनी त्या महिलेला जेवण दिले व विचारपूस केली. परंतु बेवारस महिला कसलाच प्रतिसाद देत नव्हती.
सदरील माहिती सुधीर सोनवणे यानीं सामाजिक कार्यकर्ते संजयकुमार बोंदर याना फोनवरून सांगितली. त्यावरुन संजय बोंदर यानीं जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांना बेवारस महिलेची माहिती दिली असता जिल्हाधिकारी यांनी तातडीने तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालय अधिक्षक डाँ.चंचला बोडके यानां फोनवर सूचना दिल्यानंतर १०८ ऍम्ब्युलन्स काही वेळाने घटना स्थळ पोहोंचली व उपजिल्हा रुग्नालय,तुळजापूर दाखल करुन संबंधीत बेवारस महिलेवर प्राथमिक उपचार करण्यात आले.
त्यानंतर पुढील उपचारासाठी उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविल्याचे डाँ.चंचला बोडके यानीं अधिकृत व्रत्त दिले. सदरील विषयी डाँ.चंचला बोडके,सामाजिक कार्यकर्ते संजय कुमार,शिराढोणचे सरपंच चंद्रकांत सोनवणे,पोलीस पाटील अमोल सोनवणे,ग्रामसेवक एस.एन.चौधरी, सुधीर सोनवणे,लखन पवार,राम घोळवे,बबन गंभीरे तसेच महत्वाचे म्हणजे १०८ अँम्ब्युलन्श संबंधीत अधिकारी व कर्मचारी यांचे योगदान लाभले.
