तुळजापूर दि 3 : कुमार नाईकवाडी
मराठवाडा युवा विकास मंडळ औरंगाबाद यांच्यावतीने उस्मानाबाद जिल्हास्तरीय कोविड योद्धा पुरस्कार तुळजापूरचे नगरसेवक सुनील रोचकरी यांना मानपत्र देऊन प्रदान करण्यात आला. मराठवाड्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यांमधून एक संस्था आणि एक व्यक्तीचा 3 जून लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिनी समारंभपूर्वक देऊन कोविड योध्या पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या या पहिल्याच संमेलनामध्ये पद्मविभूषण डॉक्टर अशोकराव कुकडे, राज्याच्या माजी ग्रामीण विकास मंत्री पंकजाताई मुंडे, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार भागवत कराड, संयोजक प्रवीण घुगे, या मान्यवरांची उपस्थिती होती
कोरोना आपत्तीच्या काळात लोकांना मदत कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्ती यांना प्रातिनिधिक स्वरूपात ऑनलाइन प्रवेशिका घेऊन पाच परीक्षकांच्या पॅनल द्वारे उस्मानाबाद जिल्ह्यांमधून कळंब येथील देवडा फाउंडेशन कळंब या संस्थेला आणि व्यक्तिगत पुरस्कारांमध्ये तुळजापूरचे नगरसेवक सुनील उर्फ पिंटू रोचकरी यांची निवड करण्यात आली, निवडीनंतर रा स्व संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी गणेशराव जळके, संस्कार भारतीचे प्रदेश सहमंत्री डॉक्टर सतीश महामुनी, भाजपाचे जिल्हा चिटणीस गुलचंद व्यवहारे, पत्रकार देविदास पाठक, उद्योजक संतोष जाधवर यांच्या उपस्थितीत नगरसेवक सुनील रोचकरी यांना मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
कोरोना या आपत्तीच्या काळात अनेक लोकांनी मदत कार्य केले आहे अनेक संस्थांनी देखील गोरगरीब लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले आहे मराठवाडा युवक विकास मंडळ या संस्थेने प्रातिनिधिक स्वरूपात ऑनलाइन पद्धतीने घेतलेल्या लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे स्मृतिदिन आयोजित कोविड संघर्ष योद्धा सन्मान व संमेलन यामधून ऑनलाइन पद्धतीने प्रवेशीका मागवल्या होत्या त्यामधून ही निवड करण्यात आली आहे तुळजापूरचे नगरसेवक सुनील रोचकरी यांची या पुरस्कारासाठी निवड झाली याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे , तुळजापुरातील मंकावती गल्ली प्रभागांमध्ये त्यांनी या काळात केलेल्या कामाचे सादरीकरण औरंगाबादच्या मराठवाडा युवक विकास मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने सादर केले होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर नगरसेवक सुनील रोचकरी यांनी तुळजापूर शहरांमध्ये ज्यांनी-ज्यांनी कोरोना आपत्तीच्या काळात मदत कार्य केलेले आहे त्या सर्वांच्या वतीने आपण हा पुरस्कार स्वीकारत आहे अशी प्रांजळ भावना व्यक्त केली.
पुरस्कार वितरण प्रसंगी तुळजापुरातील सुहास गायकवाड,शिवाजी अमृतराव,करण साळुंके,राहुल भालेकर,चंदू जाधव,पप्पू रोचकरी,सचिन सुरवसे,संतोष व्यवहारे यांची उपस्थिती होती.
