वागदरी : एस.के.गायकवाड  

 तुळजापूर तालुक्यातील मौजे वागदरी येथे थर्मल स्क्रिनिंग मशीनद्वारे ग्रामस्थांची तपासणी करण्यास सुरुवात झाली असून सध्या ५९० लोकांची तापमान तपासनी पूर्ण झाले आहे.

 दिवसेनदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच चालला असून उस्मानाबाद जिल्हा ग्रिन झोन मधून रेड झोन मध्ये प्रवेश करित आहे. येथून जवळच अवघ्या सहा कि.मी. अंतरावर असलेल्या नळदुर्ग या ठिकाणी कोरोनाचा रूग्ण आढळून आल्याने  जवळपासच्या ग्रामपंचायतीनी सतर्क राहणे ही काळची गरज आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी ग्रा.प.ने अनेक उपाय योजना राबविल्या आहेत. अनखीन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. एकंदरीत ही गरज ओळखून वागदरी ग्रा.प.ने थर्मल स्क्रिनिंग मशीन खरेदी केली असून कोरोना सहाय्यता कक्ष प्रमुख तथा ग्रासेवक जी.आर.जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली आशा कार्यकर्ती भारताबाई खंडेराव बिराजदार, अंगणवाडी मदतनीस रूपाली जाधव व ग्रा.प.कर्मचारी आदी गावात घरोघरी जाऊन प्रत्येकांची तपासणी करत आहेत. आतापर्यंत ५९०जणांची थर्मल स्क्रिनिंग मशीनद्वारे तपासणी करण्यात आली आहे.
 
Top