वागदरी : एस.के. गायकवाड

 पावसाळा सुरू होण्याच्या पूर्व संधेला रोहिणी नक्षत्रातील अवकाळी पावसाने दि.३१मे व १ जून २०२० पर्यंत सलग दोन दिवस दमदार हजेरी लावल्याने तुळजापूर तालुक्यातील वागदरी पाटी ते नळदुर्ग ६ कि.मी.रस्त्या चिखलपाण्यात बुडाला असून या रस्त्यावरुन वहान चालविताना दुचाकी, चारचाकी,तीनचाकी वहानधारकांची मोठी तारांबळ उडाली आहे.

   तुळजापूरची आई तुळजाभवानी अंबाबाई मंदिर तिर्थक्षेत्र ते अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मंदिर तिर्थक्षेत्र या दोन तिर्थक्षेत्राला नळदुर्ग मार्गे जोडणऱ्या राज्य महामार्गावर नळदुर्ग ते अक्कलकोट रस्त्यावर नळदुर्ग पासून सहा कि.मी.अंतरावर वागदरी हे गाव वसलेले आहे. या गावच्या  दैनंदिन व्यवहाराचे मुख्य ठिकाण म्हणजे नळदुर्ग होय.शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, दवाखाना, छोटे मोठे व्यवसाय, जिवनावशक वस्तू खरेदी विक्री सर्व व्यवहाराकरीता नळदुर्ग शिवाय पर्याय नाही. आशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचा हा रस्ता आहे. दोन वर्षापूर्वी या नळदुर्ग ते अक्कलकोट रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याच्या कामाला मंजुरी मिळाली रस्त्याच्या कामांला जलदगतीने सुरुवात ही झाली होती. सदर रस्त्या सिमेंटचा करण्यासाठी आहे तो रस्ता ही उखडून टाकला आहे. पण मध्येच शासन व शेतकरी यांच्यात न्यायालयात वाद सुरू झाला. आणि रस्त्याचे काम रखडले परंतु  तिन चार महिन्यापूर्वी या रस्त्याचा न्यायालयीन वाद ही मिटल्याचे समजते केवळ संबंधित गुत्तेदराच्या हलगर्जीपणामुळे या रस्त्याच्या कामाला सुरूवात करण्यास दिरंगाई झाल्याने वागदरी सह गुजनूर,शहापूर येडोळ, येथील ग्रामस्थाना नाहक त्रासाला  सामोरे जावे लागत आहे. आता कुठेतरी पावसाला सुरुवात झाली आहे. अजून पूर्ण पावसाळा बाकी आहे. पावसाळ्यात चार महिने या रस्त्यावरुन ये जा करणे म्हणजे मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तरी शासनाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला खडीकरण मजबूतीकरण करून हा रस्ता रहदारी साठी सुरळीत करावा अशी मागणी जनतेतून होत आहे.
 
Top