काटी :  उमाजी गायकवाड 

तुळजापूर तालुक्यातील काटी येथे बुधवार दि. (2) रोजी येथील नाझ फाऊंडेशन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने संस्थेचे सचिव डॉ. अनिस युसूफ मुजावर यांच्या वतीने मागील दोन महिन्यांपासून कोरोना कक्षात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व ग्रा.पं. सदस्यांना कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायाकरीता आणि सुरक्षिततेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून "आर्सेनिक अल्बम 30' रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या गोळ्यांचे  मोफत वाटप ग्रामपंचायत सदस्य हेरार काझी यांच्या हस्ते करण्यात आले.  
  
  यावेळी आर्सेनिक गोळ्या विषयी माहिती सांगून  कोरोना विषाणूच्या विरोधात लढत असताना नागरिक मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार अशा अन्य आजाराशी झगडत आहेत. त्यांच्या आरोग्याचा विचार  करून काटी येथे होमिओपॅथिक उपचार पद्धती सुरू केल्याचे डॉ.अनिस मुजावर यांनी यावेळी सांगितले.
      
   यावेळी डॉ.अनिस मुजावर, पत्रकार उमाजी गायकवाड, ग्रा.पं. सदस्य हेरार काझी, सुहास साळुंके, नजीब काझी,अनिल बनसोडे यांच्यासह कोरोना कक्षातील कर्मचारी उपस्थित होते.
 
Top