तुळजापुर : कुमार नाईकवाडी

 श्री तुळजा भवानी मातेच्या मंदीरा शेजारी असलेल्या एका २२ वर्षीय तरुणाची राहत्या घरात दि.३ जुन बुधवार रोजी राञी ११/३० च्या वाजण्याच्या सुमारास गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना घडली. 

 आकाश अशोकराव पाटील असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्छात आई वडील भाऊ बहीन असा परिवार आहे. गुरुवारी सकाळी ११/३०  शुक्रवार पेठ भागातील स्मशान भुमीत अंत्य संस्कार करण्यात आले. आकाश याच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या बाबतीत तुळजापुर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली. आकाश या तरुणा ने अज्ञात  कारणामुळे गळफास लावुन आत्महत्या केल्याचे समजते.
 
Top