तुळजापुर, दि. 4 : कुमार नाईकवाडी

तीर्थ क्षेत्र तुळजापूर येथे  महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून जगात उद्भवलेल्या महामारीमध्ये महाराष्ट्रात रक्त पुरवठ्याची कमतरता लक्षात घेऊन तुळजापूरातील युवकांनी मित्र परिवारातर्फे गुरुवार रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत 105 रक्तदात्यांनी रक्तदान केले.



तुळजापुर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, कासार गल्ली आर्य चौक येथे गुरुवार  दि. 4 जून रोजी तुळजापुर मित्र परिवार यांच्यावतीने सदरील रक्तदान शिबिर संपन्न झाले. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राबवित असलेला रक्तदानाचा उपक्रम स्वागतार्ह आहे. आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा पडू नये, रक्तसाठा ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. 

या रक्तदान शिबिरात सह्याद्री ब्लड बँक उस्मानाबाद यांनी मोलाचे सहकार्य केले. सदरील शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विश्वेश पाठक, विजय मगर, सचिन साखरे, सुरज जगताप, राजेश गायकवाड, दत्ता वाघमारे, रवी महामुनी, गणेश कोठावळे, राहुल साळुंके, प्रणव निकते, विशाल शेटे आदींनी पुढाकार घेतला...


 
Top