अणदूर दि. ०४ : तुळजापुर तालुक्यातील अणदूर येथे गुरुवार रोजी कोरोनाच्या संकटकाळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखा-अणदूर च्या वतीने डॉ. हेडगेवार रक्तपेढी, सोलापूर च्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

 भारत मातेच्या प्रतिमेची पूजा व शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पूजा करून रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली.  कोरोना महामारीच्या या युद्ध काळात रक्ताचा तुटवडा जानवल्याने व आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखा-अणदूरने या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.  शिबिरामध्ये सोशल डिस्टनसिंगच्या नियमानुसार, तोंडाला मास्क बांधून, सॅनिटाइझर चा वापर करत योग्य ती काळजी घेऊन शिबिराचे नियोजन केले होते. यावेळी एकूण ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.



      डॉ. हेडगेवार रक्तपेढीतील वैद्यकीय अधिकारी डॉ. गालियाल, जनसंपर्क अधिकारी सुनिल हरहरे, नर्सिंग स्टाफ रुपाली लोंढे, तंत्रज्ञ अमृता चव्हाण, मदतनीस निलवा हेगडे व ड्रायव्हर उपेंद्र भिमनपल्ली यांचे सहकार्य मिळाले.  यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक शिवाजीराव घुगे, महावीर कंदले, उमाकांत करपे यांच्यासह संघपरिवार व गावातील प्रा.गौरीशंकर धुमाळ, डॉ.जितेंद्र कानडे, बालाजी मोकाशे, प्रकाश घोडके गुरूजी, ज्ञानेश्वर घुगे, डॉ.नागनाथ कुंभार, चंद्रकांत गुड्ड, अजय अणदूरकर, शिवशंकर तिरगुळे, प्रा. सत्येंद्र राऊत सर, नळदुर्ग तालुका सहकार्यवाह राहुल राठोड, राजेश देवसिंगकर, राजू नाईकवाडे, शिवकुमार बिराजदार, नागनाथ घोडके, प्रशांत सुरवसे, सोमनाथ लंगडे, वैभव मोकाशे, मारुती बागडे, लक्ष्मण शिंदे, सचिन आलुरे, किशोर मुळे, अंकुश चिनकरे आदीजण उपस्थित होते.
 
Top