नळदुर्ग, दि. 22 : कोरोना च्या महामारीमुळे सर्वत्र लॉकडाउन होते. यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे हाल झाले सध्या लॉकडाउन हळू हळू शिथिल केले जात आहे काही प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे पण सर्वच लोकांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न सुटला नाही तसेच लॉकडाउन असल्याने लोक कमी प्रमाणात बाहेर आहेत. त्यामुळे रिक्षा चालवून पोट उपजीविका भागविणारे यांची परिस्थिती लक्षात घेता कोरोना मुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत नळदुर्ग मधील रोजच्या कमाईतून पोट भरणारे तसेच हातावर पोट असलेले मजूर व रिक्षा चालकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती च्या वतीने तांदूळ, गहू आट्टा, तुरदाळ, तिखट, मसाला, तेल, जिरे, मोहरी, साबण असे आठ दिवस पुरेल इतके किराणा मालाच्या किटचे व रोगप्रतिकारक शक्ति वाढवनन्यासाठी आयुर्वेदिक काड़ा व मास्क चे सर्वाना वाटप करण्यात आले. यावेळी पत्रकार विलास येडगे, विशाल डुकरे, प्रभाकर घोडके, राजु ठाकुर व  शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर शाखेचे  सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.

 
Top