नळदुर्ग : सुहास येडगे
नळदुर्ग येथील प्रतिबंधीत क्षेत्र तसेच बस्थानकाच्या पाठीमागे असणाऱ्या बंजारा वस्तीमध्ये दि.१७ जुन रोजी शिवसेनेच्या वतीने आर्सेनिकम अल्बम ३० या होमिओपॅथी गोळ्यांचे तसेच मास्कचे वाटप करण्यात आले.शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तसेच आमदार कैलास घाडगे--पाटील यांच्यावतीने या गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे.
नळदुर्ग शहरांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दि.१५ जुन रोजी नळदुर्ग शहरांतील माऊली नगर परीसरात राहणारी एक व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळुन आली. ही कोरोना पॉझिटीव्ह व्यक्ती हॉटेल चालक असल्याने नळदुर्गकरांची चिंता वाढली आहे. कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळुन आल्यानंतर शहरांतील माऊली नगर परीसर प्रशासनाने तात्काळ सील करून हा परीसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणुन जाहीर केला आहे. दि.१७ जुन रोजी शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा आमदार कैलास घाडगे--पाटील यांच्या सहकार्यातुन या प्रतिबंधीत क्षेत्रांतील नागरीकांनारोग प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या आर्सेनिकम अल्बम ३० या होमिओपॅथी गोळ्या तसेच मास्कचे वाटप युवा सेनेचे माजी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके यांनी केले. जिल्ह्यांतील ज्या गावात कोरोना बाधित रूग्ण आढळुन आले आहेत त्या गावांना शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास घाडगे--पाटील हे तात्काळ भेट देऊन त्या गावांतील नागरीकांना दिलासा देण्याबरोबरच त्यांना अन्न धान्याचे किट तसेच आर्सेनिकम अल्बम ३० या होमिओपॅथी गोळ्या व मास्कचे वाटप करीत आहेत. दि.१७ जुन रोजी नळदुर्ग येथील माऊलीनगर या प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरीकांना आर्सेनिकम अल्बम ३० या गोळ्यांचे व मास्कचे वाटप करण्यात आले. युवा सेनेचे माजी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके यांनी या गोळ्यांचे वाटप केले., या प्रतिबंधीत क्षेत्रासह बस्थानकाच्या पाठीमागे असणाऱ्या बंजारा वस्तीतील नागरीकांनाही या गोळ्या तसेच मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर घोडके यांनी या गोळ्यांचे सेवन कसे करायचे याबाबत मार्गदर्शन केले.यावेळी शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुका अध्यक्ष मेजर राजेंद्र जाधव, पत्रकार विलास येडगे, सुहास येडगे, तानाजी जाधव, उत्तम बनजगोळे,लतीफ शेख, शिवाजी नाईक,सामाजिक कार्यकर्ते अमर भाळे,मारुती खारवे आदीजन उपस्थित होते.
