तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथील फक्त सरपंच पदाची निवडणूक गुरूवारी सकाळी होणार असुन दि.२५ रोजी सरपंच निवडीसाठी विशेष सभा बोलावण्यात आली असुन कोण होणार तामलवाडीचा नविन सरपंच? याकडे संपुर्ण तामलवाडीकरांचे लक्ष लागले आहे.
तामलवाडी ग्रामपंचायतीचा पाच वर्षाचा कार्यकाल हा जवळपास संपत आला आहे परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.यापुर्वी भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष तथा माजी सैनिक शिवाजी सावंत यानी तामलवाडी विहीर गायब भ्रष्टाचार प्रकरण बाहेर काढले व या विहीर गायब प्रकरणात तत्कालीन सरपंच ज्ञानेश्वर माळी निलंबनाची कारवाई करण्यात आली व सरपंच पदावरून पायउतार व्हावे लागले. नंतर प्रभारी सरपंच म्हणून दत्तात्रय वडणे यानी पदभार स्वीकारला.परंतु सरपंच पद हे नागरकांचा मागासप्रवर्ग असल्याने सरपंच या पदासाठी दि.२५ रोजी निवडणूक घेण्यासाठी विशेष सभा बोलावण्यात आली आहे. दि.२५ वार गुरूवार रोजी सकाळी १० ते १२ पर्यंत नामनिर्देशन वाटप व स्वीकारण्यात येणार आहे.तसेच दू.२ वाजता कोरम पुर्ण असल्यास सभा घेणे,सरपंच पदाच्या नामनिर्देशन पत्राची छाननी,उमेदवारांची नावे वाचणे,उमेदवारी परत घेणे,परत घेतलेले व उमेदवार असलेली नावे वाचणे,आवश्यक असल्यास सरपंच पदासाठी निवडणूक घेणे इत्यादी बाबी पुर्ण करण्यात येणार असल्याचे तहसीलदार यानी दिलेल्या पत्रात नमुद करण्यात आले आहे.आता तामलवाडीच्या सरपंचपदी कोण विराजमान होणार? याकडे संपुर्ण तामलवाडीकरांचे लक्ष लागले आहे.