उस्मानाबाद :- कळंब येथील वैशाली बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था संचलित नवजिवन गोशाळा परिसरात मनसेचे नेते माजी आमदार बाळा नांदगावकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १०१ फळझाले व आयुर्वेदिक रोपांचे वृक्षारोपण मनसेचे जिल्हासंघटक अमरराजे कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
या गोशाळेत अनेक भाकड जनावरे असून या मुक्या जनावरांना मनसेच्या महिला जिल्हाध्यक्ष वैशालीताई गायकवाड यांनी चांगल्या प्रकारे संभाळ केलेला आहे.जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या गोशाळेस सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन अमरराजे कदम यांनी केले.यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब ढवळे यांनी या गोशाळेस १०१ रोपे उपलब्ध करून दिलीत.
सदर वृक्षरोपणास शिक्षक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष बबन वाघमारेसर,परंडा विधानसभा अध्यक्ष जलालभाई शेख,शेतकरी सेनेचे उपजिल्हाध्यक्ष प्रभाकर तात्या धुमाळ, परंडा माजी तालुकाध्यक्ष बापू क्षिरसागर,
तालुकाउपाध्यक्ष सलीम औटी सह अनेक मनसैनिक हजर होते.