काटी : उमाजी गायकवाड

 तुळजापूर तालुक्यातील काटी येथील भीमनगर मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार दि. 26 रोजी सकाळी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा दलित मित्र नंदू बनसोडे यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी आपल्या प्रास्ताविकात दलित मित्र नंदू बनसोडे उपस्थितांना मार्गदर्शन करताना आपल्या कवितेतून त्यांनी राजर्षी शाहू महाराजांचा जीवनपट थोडक्यात उलगडून दाखविला. तसेच शाहू महाराज खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. ते सामान्य जनतेत स्वतः जाऊन मिसळत होते. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याची माहिती त्यांनी यावेळी देऊन शाहू महाराजांचे कार्य प्रत्येक्षात अंमलात आणले असे मत व्यक्त केले.

       यावेळी दलित मित्र नंदू बनसोडे, गौतम बनसोडे, दादाराव डोळसे, सयाजी बनसोडे, शुभम बनसोडे, अजित बनसोडे आदीजण उपस्थित होते.
 
Top