तुळजापुर : कुमार नाईकवाडी
तुळजापूर शहरामध्ये कोरोना बाधीत तीन रुग्न आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये तुळजापुर तालुक्यातील हंगरगा (तुळ) येथील कोरोनाबाधीत दोन रुग्ण येथील लोहीया परिसरात राहतात. त्यांच्या संपर्कातील एकुण २५ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्याच बरोबर येथील आर्यचौक येथील भागात राहणाऱ्या एक व्यक्तीस कोरोना बाधा झाल्याने त्यांच्या संपर्कातील १६ लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले. अशा एकुण ४१ लोकांना येथील १०८ भक्त निवास या ठिकाणी कोरोनटाईन करण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात पसरल्याने तुळजापुर शहरातील रस्ते सामसुम झाले असून व्यापारी वर्गानी आपली दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळे तुळजापुरात सन्नाटा पसरला होता. तुळजापुर नगर परिषद च्या वतीने तातडीने उपाय योजना करुन नगराध्यक्ष सचिन रोचकरी, मुख्याधिकारी आशिष लोकरे, नगरसेवक अभिजीत कदम, नानासाहेब लोंढे, राहुल खपले आदीसह न.प.कर्मचारी वर्गानी येथील आर्य चौक व लोहीया परिसरात भेट देऊन त्या भागाची पहाणी करुन तो भाग संपुर्ण सील केला असून त्या भागातील परिसराची जंतु नाशक फवारणी करण्यात आली आहे.
शहरात कोरोना बाधीत तीन रुग्न आढळल्याने तुळजापुर शहरात दि.२८ ते ३० पर्यत तीन दिवस जनता कर्फ्यु करण्यात आल्याचे तुळजापुर नगरीचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी सांगितले. या तीन दिवसाच्या कालावधीत फक्त अत्यावश्यक सेवा चालु राहतील. बाकी सर्व आस्थापना दि.२८ रविवार ते दि.२९ सोमवार दि.३० मंगळवार या कालावधीत बंद ठेवुन प्रशासनास सहकार्य करावे, तसेच नागरीकांनी आपल्या सुरक्षेतेची काळजी घ्यावी, मास्कचा वापर करावा, वारंवार हात साबणाने धुवावेत, तसेच विनाकारण घराबाहेर पडु नये, गरज असेल तरच बाहेर पडावे तसेच आपल्या परिसरात बाहेर गावाहुन आलेल्या नागरीकांची माहिती प्रशासनास देण्यात यावी, सर्व जनतेने सतर्क राहावे असे आवाहन नगराध्यक्ष सचिन रोचकरी, मुख्याधिकारी आशिष लोकरे यांनी नागरीकांना केले आहे.