जळकोट, दि. ९ : मेघराज किलजे

 तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील दि अपेक्स इंग्लिश स्कूलच्या वतीने श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालय या संस्थेस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर देण्यात आले.

जळकोट येथील दि  अपेक्स इंग्लिश स्कूल हि संस्था यापूर्वी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. सध्या कोरोना देशभर धुमाकूळ घालत आहे. सर्वत्र लॉक डाउन नंतर व्यवहार सुरू झाले आहेत. गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा शिरकाव होऊ नये. यासाठी स्कूलच्या वतीने खबरदारी घेण्यात येत आहे. या कृषी विज्ञान मंडळा बरोबर इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन सॅनिटायझर देण्यात येत आहे. त्याचबरोबर जनजागृती करण्यात येत आहे. 

इंग्लिश स्कूलच्या वतीने जळकोट, जळकोटवाडी, बोरमन तांडा, जेवळी, भोसगा, तूगाव गावठाण, बोरगाव,मुर्टा,होर्टी या गावातहि विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. याकामी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोपाळ सुरवसे, स्कूलचे मुख्याध्यापक महेश कोरे, आयेशा शेख, उषा कोरे, सुरेखा बिडकर, चव्हाण मॅडम, शिपाई हरीलाल लोंढे आदीनी पुढाकार घेतला आहे. यावेळी श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालय या संस्थेचे अध्यक्ष मेघराज किलजे, मुख्याध्यापक महेश कोरे,शिवराज राचेट्टी, निशांत राठोड आदीजण उपस्थित होते.

 
Top