अणदूर :  तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथील श्री श्री गुरुकुल या शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले त्या समस्यांवर मात करीत अभिनव महेश मोकाशे व ओंकार अनिल हांडे यांनी यश मिळवीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असते हे सिध्द केले आहे.
       
 श्री श्री गुरुकुल मधील मागील वर्षी दोन विद्यार्थ्यांनी यश मिळवत प्रवेश मिळविला होता ती परंपरा कायम ठेवली आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ जितेंद्र कानडे,सचिव डॉ नागनाथ कुंभार, संचालिका डॉ रुपाली कानडे,मुख्याध्यापिका पुष्पा लामतुरे,लक्ष्मण नरे यांनी अभिनंदन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका भाग्यश्री गोरे,सुरेश गायकवाड, संतोष मोकाशे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
 
Top