काटी : तुळजापूर तालुक्यातील काटी येथील जेष्ठ नागरिक नागनाथ बंडा परीट वय (73) यांचे रविवार दि.21 रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी 10:30 वाजता येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ते येथील प्रगतशील शेतकरी सुनिल परीट यांचे वडील होत.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
