नळदुर्ग :
तुळजापूर तालुक्यातील रामतिर्थ, रामनगर, गायरान तांडा, येडोळा, जखणी तांडा येथे एसबीआय फाउंडेशन मुंबई व दिलासा जनविकास प्रतिष्ठान औरंगाबाद यांच्या सामाजिक दायित्व निधीतून ग्रामसेवा कार्यक्रम राबवित आहे. याअंतर्गत ग्रामीण भागातील युवकांची शारिरिक व मानसिक विकास घडवून आणण्यासाठी योगा करण्यात आले .
यावेळी प्रत्येक गावातील युवक वर्ग, लहान शाळकरी मुले उपस्थित राहून योगा करण्यात आले. यावेळी दिलासाचे प्रकल्प व्यवस्थापक विलास राठोड, गुरुदेव राठोड, अजित राठोड, भुषण पवार, बाळासाहेब चव्हाण यांनी परिश्रम घेतले...
