तुळजापुर : कुमार नाईकवाडी
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पालावरती वास्तव्यास राहणाऱ्या २० गोर गरीबांना येथील सामाजिक कार्यकर्ते तथा आडत व्यापारी अभिषेक कोरे यांच्या वतीने दि.२८ रविवार रोजी उपपोलीस निरीक्षक राहुल रोटे व प्रविन कदम यांच्या हस्ते पालावरती राहणाऱ्या गोर गरीबांना ताडपञीचे वाटप करण्यात आले. या वेळी कुलदीप औटी, अमोल जाधव, सोमनाथ शिंदे, नागेश शिराळकर शेटे आदीजण उपस्थित होते.