तुळजापुर : कुमार नाईकवाडी
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर तुळजापुर शहरात कडक अमलबजावनी करण्यात यावी अशा प्रकारचे एक लेखी निवेदन तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, न.प.मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व पोलीस निरीक्षक यांच्याकडे तुळजापुर शहरातील सामाजिक कार्यकर्ते संजय बोदंर यांच्यावतीने दि. २८ रविवार रोजी देण्यात आले.
बोदंर यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटंले आहे की, कोरोना संसर्गजन्य साथीच्या रोगाने गेल्या तीन माहिन्यापासुन मोठा हाहांकार माजविला आहे. या पार्श्वभूमीवर तुळजापुरात हाँटस्पाँट भागात व तुळजापुर शहरात कडक अंमलबजावनी करण्यात यावी. तसेच तुळजापुर शहरात मुख्य गर्दीच्या ठिकाणी चौका चौकात सोशल डिस्टंसीगं चे पालन केले जात नाही, मास्क न लावता नागरीक रस्त्यावर फिरत आहेत. एक माहिन्यापुर्वी ज्या प्रमाणे नागरीक आपली काळजी घेत होते. प्रशासन सुद्धा नियम न पाळणार्या नागरीकांवर कारवाई करीत होते. आता या कोरोना चा विसर पडल्याचे दिसुन येत आहे. एक महिन्यापासुन शासकीय यंञणेने कठोर अंमलबजावनी न केल्यामुळे तुळजापुर शहरात व तालुक्यात कोरोना पेशंटची संख्या वाढत आहे. जर कठोर अमलबजानी केली नाही तर तुळजापुर शहरातील नागरीकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल .तुळजापुर शहरा मध्ये ज्या ठिकाणी कोरोना बाधीत रुग्नाची संख्या वाढत आहे. त्या ठिकाणी पोलीसांच्या सहाय्याने कडक अंमलबजावनी करुन कोणत्याही व्यक्ती त्या हाँटस्पाँट परिसरा मध्ये येणार नाही आणि आतील व्यक्ती बाहेर जाणार नाही अशा सुचना नागरीकांना देण्यात याव्यात. शहरात कडक अमलबजावनी करुन नागरीकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करावा.