इटकळ दि.१५ :

इटकळ ता तुळजापूर येथील ५५वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना पाॅजिटीव्ह आला आसुन संपर्कात आसलेल्या २८  लोकांनातुळजापूर येथे  काॅरंटाईन केले आहे. 

ता.८रोजी ताप येत असल्याने अणदूर येथे दोन दिवस उपचारासाठी गेले परंतु ताप कमी झाला नाही. ता.१० रोजी सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.ता.१३ शनिवारी रात्री उशिरा कोरोना टेस्ट पाॅजिटीव्ह आली.रविवारी सायंकाळी ५वा.तुळजापूर येथील वैधकीय पथक,तहसील विभाग पोलीस प्रशासन इटकळ गावामध्ये दाखल झाले.महिलेच्या घरातील व परिसरातील माहीती घेऊन संपुर्ण गल्ली सील करण्यात आली.संपर्कात आलेल्या २८ लोकांना  दोन ऑब्युलस वाहनामधुन तुळजापूर येथील काॅरंटाईन कक्षात रवाना करण्यात आले.संपुर्ण गावामध्ये सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवस जनता कर्फ्यु लागु करण्यात आले आहे. 

यावेळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रशांत सिंह मरोड ; तुळजापक येथील वैद्यकीय अधिकारी सुहास पवार;अणदूर येथील वैधकीय अधिकारी अविनाश गायकवाड ; सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत ; स.पो.नी.अमित मस्के ; सहाय्यक फौजदार राजाभाऊ सातपुते ; पोलीस पाटील विनोद सलगरे ; ग्रामसेवक संजय घोगरे ; माजी सरपंच अझर मुजावर ; अशपाक मुजावर ; उपसरपंच नजीर शेख ;श्रीकृष्ण मुळे;अविनाश पाटील;  इटकळ येथील आशा कार्यकर्ते या सह कोरोना कक्ष समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.नागरीकांनी जनता कर्फ्यूचे  काटेकोरपणे पालन करावे अन्यथा याचे उल्लंघन करणाऱ्या वर कारवाई करण्यात येईल असा इशारा ही कोरोना कक्ष समिती च्या वतीने यावेळी देण्यात आला.

यावेळी अणदूर येदिलेल्या वैधकीय अधिकारी अविनाश गायकवाड यांनी सांगितले की इटकळ येथील ५५वर्षीय महिलेची कोरोना टेस्ट पाॅजिटीव्ह आली आहे. खबरदारी साठी त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना काॅरंटाईन केले आहे. 
 
Top