अणदुर, दि. ०३ :

कोरोनाच्या संकटकाळात लॉकडाउनचे तंतोतंत पालन करत तुळजापुर तालुक्यातील अणदुर येथे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले.

सर्वप्रथम सोशल डिस्टणसचे पालन करत  गोपीनाथरावजी मुंडे यांच्या प्रतिमेचे पुजन आण्णासाहेब प्रकाश घुगे यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी अक्षय घुगे , दिपक घुगे, अनिकेत मोहराळे, स्वप्निल घुगे, गौरव घुगे यांच्यासह भगवान बाबा प्रतिष्ठाणचे असदस्य उपस्थित होते.
 
Top