तामलवाडी : सर्जेराव गायकवाड 

तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी पोलिस ठाण्यांतर्गत नेमणुक करण्यात आलेल्या कोरोना वारीअर्संना बालाजी अमाईन्स लि.यांच्यावतीने दि.२ रोजी दोनशे टी शर्ट देण्यात आले आहेत.

      देशासह राज्यामध्ये कोविड - १९ चा वाढता संसर्ग लक्षात घेता या विषाणुला प्रतिबंध करण्यासाठी सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या तामलवाडी येथील बालाजी अमाईन्स लि यांच्यावतीने प्रशासनाला आणी समाजाला शक्य होईल ती मदत करत असल्याचे दिसुन येत आहे.या कोरोना विषाणूला  रोखण्यासाठी ग्रामस्तरावर उस्मानाबाद पोलिस अधिकारी यांच्या आदेशाने तामलवाडी पोलीस ठाणेअंतर्गत गावोगावी ग्रामसुरक्षा दलाची नेमणुक करण्यात आली आहे.यामध्ये अनेक तरूण सहभागी होऊन कोरोनाच्या या लढाईत आपले योगदान देत आहेत.तामलवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन मीरकर यानी बालाजी अमाईन्सकडे या कोरोनो वारीयर्सकरीता टी शर्टची मागणी केली.  सपोनि नितीन मिरकर यांच्या विनंतीस मान देऊन बालाजी अमाईन्सने तात्काळ दोनशे टी शर्ट उपलब्ध करून दिले.हे दोनशे टी शर्ट दि.२ रोजी सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन मीरकर यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले आहेत.

     याप्रसंगी सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन मिरकर,सपोउनि सुबोध जमदाडे, ठाकुर साहेब,बालाजी अमाईन्सचे अधिकारी मारूती सावंत,ज्ञानेश्वर घोटकर,तसेच पोलिस कर्मचारी आदी उपस्थित होते.
 
Top