नळदुर्ग, दि. 02 :
कोरोना बाधित रुग्ण बरा होऊन घरी परतल्यावर त्यास मानसिक आधार देण्याची गरज आहे. प्रशासनास प्रतिबंधित क्षेत्रात आवश्यक ते खबरदारी देण्याचे आदेश उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नळदुर्ग येथे दिला.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मंगळवार दिनांक २ जून रोजी नळदुर्ग येथील प्रतिबंधित क्षेत्राला भेट देऊन आढावा घेतला. यावेळी त्यांनी आयुष्य मंत्रालयाने रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्याचा वापर करण्यास सांगितले तसेच वैद्यकीय अधिकारी, पोलीस प्रशासन, महसूल अधिकारी यांना येणाऱ्या काळात सतर्क राहावे, अशा सूचना दिल्या. त्याचबरोबर खा. निंबाळकर यांनी प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या जेवणाच्या डब्याबाबत तहसीलदार व न प कर्मचाऱ्याना विचारणा केली. नळदुर्गकरानी येणाऱ्या काळात सजग राहून मुंबई पुणे व अन्य राज्यातून आलेल्या लोकांची माहिती प्रशासनास कळवावी व कोरोना बाधित रुग्णाप्रति कोणताही भेदभाव न ठेवता त्याला परत मूळ प्रवाहात आणण्यासाठी मानसिक आधार व बळ द्या, असे सांगितले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार, न प कर्मचारी, पोलीस अधिकारी शहरप्रमुख संतोष पुदाले, उप तालुकाप्रमुख सारदारसिंग ठाकूर, नळदुर्ग शहर सोशल मीडिया प्रमुख सुनील गव्हाणे, शाम कणकधार, राजुसिंग ठाकूर, हे सोशल डिस्टन्स पाळून उपस्थित होते.
