तुळजापुर : कुमार नाईकवाडी
संसर्गजन्य कोरोना वायरस च्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद च्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी दि.२ जुन मंगळवार रोजी येथील उपजिल्हा रुग्णालयातील व श्री तुळजा भवानी मंदीर संस्थान मधील १०८ भक्त निवास मधील क्वारनटाईन झालेल्या रुग्नाची भेट घेऊन त्या रुग्नाची स्वःता जातीने लक्ष देऊन आपण या ठिकाणी व्यवस्थित आहात का? वेळेवर जेवण मिळते का?औषध उपचार व्यवस्थित दिला जातो का? अशी विचार पुस करण्यात आली. तसेच आपण सर्वानी काळजी करु नये संपुर्ण आरोग्य विभागाची प्रशासकीय यंञणा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे सांगितले.
तसेच उपजिल्हा रुग्नालयाची व १०८ भक्त निवास ची पहाणी करुन तेथील डाँक्टराना आपण रुग्नाची काळजी घ्यावी असे सांगितले. या वेळी तहसीलदार सौदागर तांदळे, तुळजापुर येथील उपजिल्हा रुग्नालयाच्या वैद्यकिय अधिक्षक डाँ चंचला बोडके मँडम, डाँ अमित शिरसीकर, डाँ होनमाने, डाँ. रोचकरी डाँ श्रीधर जाधव आदीसह शिस्टर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
