नळदुर्ग, दि. 2 : सर्वत्र कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसत असुन  उस्मानाबाद जिल्हायात देखील रुग्णांच्या संख्येत   वाढत आहे. 

  नळदुर्ग शहरात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने कोरोना महामारीमुळे नागरिक भितीच्या सावटाखाली असुन  अद्यापही कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही . त्यामूळे या रोगाला परतवुन लावण्यासाठी आपली व आपल्या कुटूंबाची काळजी ही आपण स्वतःच घेणे गरजेचे आहे. काल नळदुर्ग शहरातील एकाचे रिपोर्ट पॉसिटीव्ह आल्याने शहरात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. रुग्ण ज्या भागात राहतो तो भाग प्रतिबंधित विभाग जाहीर करण्यात आले आहे.


         याभागातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेत प्रतिबंधात्मक उपाय खर्चात म्हणून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे होमियोपॅथीचे अर्सेनिक अल्बम -30 या औषधीचे मोफत वाटप डॉ. पद्मसिंहजी पाटील यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त तुळजापूरचे आमदार  राणाजगजीतसिंह पाटील यांच्या संकल्पनेतुन तसेच होमिओपॅथीचे डॉ. सुधाकर मोहोळे ( सोलापूर ) यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग शहर भाजप व युवा मोर्चाच्या वतीने तसेच भाजपचे सुशांत भूमकर, युवामोर्चा शहराध्यक्ष श्रमिक पोतदार यांच्या सौजन्याने प्रतिबंधित भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व स्वयंसेवक गौस शेख यांना प्रतिबंधित भागातील कुटुंबाला या औषधाचे वाटप करण्यासाठी आर्सेनिक अल्बम 30 हे औषध व औषध कसे घ्यावे, त्याची पथ्य आदी बाबतचे पत्रक सुपूर्द करण्यात आले यावेळी युवानेते सुशांत भूमकर, भाजप युवामोर्चाचे शहराध्यक्ष श्रमिक पोतदार, संजय जाधव, सरचिटणीस विशाल डुकरे, गौस शेख, मुन्ना जहागीरदार आदी उपस्थित होते.
 
Top