नळदुर्ग : सुहास येडगे 

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे नळदुर्ग येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जन्मोत्सव समितीच्या वतीने यावर्षी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.  गेल्यावर्षी जयंतीचे औचित्य साधून समितीच्यावतीने लावण्यात आलेल्या १६ वृक्षांचा पहीला वाढदिवस दि.१ जुन रोजी समितीच्यावतीने साजरा करण्यात आला. 

 याहीवर्षी नळदुर्ग येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जन्मोत्सव समितीच्यावतीने अहिल्यादेवींची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात येणार होती मात्र कोरोना या वैश्विक महामारीमुळे राज्यात सर्व सण, उत्सव, यात्रा, जयंत्या यांच्यावर सरकारने बंदी घातली आहे.त्यामुळे समितीने यावर्षी नळदुर्ग शहरात  अहिल्यादेवींची जयंती साधेपणाने घरीच साजरी करण्याचा निर्णय घेतला. दि.१ जुन रोजी समतीच्यवतीने मारुती घोडके यांच्या निवासस्थानी अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करून अहिल्यादेवींना अभिवादन करण्यात आले.सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठलराव जाधव व माजी नगरसेवक सुधीर हजारी यांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे,पत्रकार उत्तम बनजगोळे, प्रविण चव्हाण तसेच समितीचे पद्माकर घोडके, अमर भाळे,सुहास येडगे, प्रभाकर घोडके, विलास येडगे,मारुती घोडके, आदीजन उपस्थित होते.प्रतीमा पुजनांतर गेल्यावर्षी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जन्मोत्सव समिती नळदुर्गच्यावतीने न.प.रस्त्याच्या दुतर्फा पर्यावरण पुरक असणाऱ्या सप्तपर्णी वृक्षांची लागवड करण्यात आली होती. जवळपास १६ झाडे त्यावेळी लावण्यात आली होती. गेलीवर्षभर या वृक्षांचे अतीशय चांगल्या प्रकारे जतन करून ही झाडे जगविण्यात आली आहेत ही झाडे जगविण्यामध्ये न.प.कर्मचारी राजाभाऊ सुतार, तसेच या भागांतील दुकानदार बाबु टेलर, बाबुराव काळे, भगवंत सुरवसे यांचाही समितीइतकाच आहे.त्याचबरोबर समितीचे पद्माकर घोडके व अमर भाळे यांनीही हे वृक्ष चांगल्याप्रकारे जतन व्हावेत यासाठी गेले वर्षभर प्रयत्न केले आहेत या सर्वांच्या प्रयत्नामुळेच आज हे १६ वृक्ष हिरवीगार व  डौलदारपणे उभी आहेत या झाडांमुळे न.प.रस्त्याला कमालीची शोभा आली आहे. 

समितीच्यावतीने या १६ वृक्षांचा पहीला वाढदिवस दि.१ जुन रोजी साजरा करण्यात आला. यावेळी वृक्षाना फुलांचे हार घालुन तसेच रंगीबेरंगी फुगे बांधुन हा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळीसामाजिक कार्यकर्ते संजय जाधव,माजी नगरसेवक सुधीर हजारी मारुती खारवे, प्रविण चव्हाण,पत्रकार उत्तम बनजगोळे, समितीचे पद्माकर घोडके, प्रभाकर घोडके, सुहास येडगे,अमर भाळे,विलास येडगे, मारुती घोडके, यांच्यासह समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. समितीचे काम अतीशय चांगले असुन सध्या कोरोनाच्या संकटात कोरोनाचा मुकाबला करणाऱ्या महाराष्ट्र सरकारला (मुख्यमंत्री सहाय्यता निधीला) राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जन्मोत्सव समिती नळदुर्गच्यावतीने अकरा  हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे.
 
Top