तुळजापुर : कुमार नाईकवाडी

शेतकऱ्यांना बि.बियाणे उपलब्ध करुन द्यावीत तसेच शेतकऱ्यांची आर्थिक दृष्ट्या  पिळवणूक थांबविण्यात यावी, अशा प्रकारचे एक लेखी निवेदन दि.९ मंगळवार रोजी शेतकऱ्यांच्या वतीने तुळजापुर चे तहसीलदार यांच्या कडे देण्यात आले.

तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटंले आहे की, सध्या कोवीड १९ कोरोना विषाणू महामारीने शेतकरी वर्ग ञस्त असताना व सध्या पेरणीचे दिवस असल्यामुळे शेतकरी वर्ग बी बियाणे खरेदी करण्यासाठी शहरात दाखल होत आहेत. माञ शेतकऱ्यांना बी.बियाणे खत मिळत नाही शासनाच्या नियमाप्रमाणे कृषी सेवा केद्रं चालविणारे दुकानदार योग्य दरात बी.बियाणे देत नाहीत, शेतकऱ्यांना जी बी बियाणे पाहिजेत ते उपलब्ध नाही किंवा नंतर या असे दुकानदारा कडून उडवा उडवी चे उतरे मिळतात तरी शासकीय नियञंणाखाली बि.बियाणे खत विक्री करण्यात यावी, जेणेकरुन शेतकऱ्यांना चढ्या दराने बि-बियाणे खरेदी करणाऱ्या दुकानदार व्यापाऱ्याना चाप बसेल त्यामुळे शेतकरी बळीराजा हेळसांड होणार नाही, अशी विनंती करण्यात आली आहे. 

या निवेदनावर खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब भोसले, मयुर कदम, बापु नन्नवरे, गोविंद लोंढे, मुरली खपले आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

 
Top