तुळजापुर : कुमार नाईकवाडी
पान शाँप दुकान उघडण्यास परवानगी देण्यात यावी अशा प्रकारचे एक लेखी निवेदन तुळजापुर येथील पान दुकान असोशियसन च्या वतीने दि.९ मंगळवार रोजी तुळजापुर चे तहसीलदार यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांना देण्यात आले आहे.
तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे कीए कोरोना पादुर्भाव रोगामुळे गेल्या तीन माहिन्यापासुन संपुर्ण महाराष्ट्रातील पान शाँप बंद आहेत. त्यामुळे अनेक दुकानदाराचे व त्यावर अवलंबून असणाऱ्या अनेक कुंटुबावर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या तीन माहिन्यापासुन कोणतेही उत्पादनाचे साधन नसल्यामुळे त्याना अनेक अडचनी ना सामोरे जावे लागत आहे. सदर बाबीचा शासनाने गांभीर्य पुर्वक विचार करुन पान शाँप व्यवसाय करणाऱ्या शाषनाने पान शाँप उघडण्यास परवानगी देण्यात यावी. यामध्ये प्रामुख्याने पानातील विविध प्रकार ची मसाला सुपारी इत्यादींचा समावेश असलेले तंबाखु जन्य पदार्थ विक्री केली जाणार नाही याची हमी या निवेदना द्वारे आम्ही आपणास देत आहोत तरी आम्हांला पान शाँप उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर पानदुकान अशोशियन चे अध्यक्ष राजाभाऊ चोपदार, आण्णा रोचकरी, महेश गवळी, शिवानंद शिंदे, गोपाळ गंधोरे आदीसह शहरातील पान शाँप व्यवसाय करणाऱ्याच्यां स्वाक्षरी आहेत.
