उमरगा, दि. 09 :

हुंड्यात बाकी राहीलेले सोने माहेरहुन आणावेत याकरीता सुन- गायत्री योगेश सोनवणे, वय 20 वर्षे, यांना 1)योगेश धनाजी सोनवणे (पती) 2)धनाजी माणिकराव सोनवणे (सासरा) 3)प्रिया व सारीका (दोघी नणंद) सर्व रा. कवठा, ता. उमरगा यांनी लग्न झाल्यापासून वेळोवेळी शारिरीक- मानसिक त्रास दिला. त्‍यांच्या या त्रासास कंटाळून दि. 05.06.2020 रोजी 11.00 वा. सु. मौजे कवठा येथे सुन- गायत्री सोनवणे यांनी स्वत:ला पेटवून घेउन आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या संजय कडाजी जाधव रा. तुरोरी, ता. उमरगा यांच्या प्रथम खबरेवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 08.06.2020 रोजी नोंदवला आहे.
 
Top