कळंब, दि. 09 :
बंकट गणपत जावळे, दत्तात्रय श्रीराम तनपुरे, नेताजी बाबुराव कदम, तीघे रा. कळंब यांनी दि. 02.06.2020 रोजी 13.30 वा. सु. कळंब शहरा जवळील मांजरा नदी पात्रातील आपापल्या शेत जमीन व परिसरातील वाळू (गौण खनिज) 256 ब्रास वाळु अवैध उपसा- चोरी करुन विक्री केली आहे. अशा मजकुराच्या मंडळ अधिकारी, कळंब श्री. तुळशीराम मटके यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमुद तीघांविरुध्द गुन्हा दि. 08.06.2020 रोजी नोंदवला आहे.
