उस्मानाबाद, दि. 09 : 

1)सुलेमान अलिम कुरेशी 2)शोएब मनसुर शेख, दोघे रा. खिरणीमळा, उस्मानाबाद या दोघांनी दि. 02.06.2020 रोजी आपल्या राहत्या घरी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेले अन्नपदार्थ- गुटख्याचे 192 पुडे (किं.अं.19,200/-रु.) बाळगले. तर दुसऱ्या घटनेत 1)शौकत इसुफ मुल्ला, रा. खाजानगर, उस्मानाबाद हा दि. 15.05.2020 रोजी आपल्या राहत्या घरी गुटख्याचे 80 पुडे (किं.अं.8,000/-रु.) बाळगला असतांना पो.ठा. उस्मानाबाद (श.) यांच्या पथकास आढळले होते.

            सदर अन्नपदार्थ हा प्रतिबंधीत गुटखा असल्याची खात्री करुन अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती रेणूका पाटील यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमुद आरोपींविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 272, 273 सह, अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम- 26, 27, 30 अन्वये स्वतंत्र 2 गुन्हे दि. 09.06.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.
 
Top