भूम, दि. 09 : पो.ठा. भूम येथील पोना- विक्रम नाईक हे पोलीस पथकासह दि. 09.06.2020 रोजी सकाळी 10.30 वा. सु. भूम शहरात कोविड- 19 संबंधी जनजागृती व अंमलबजावणी कार्य करत होते. यावेळी महादेव शंकर लोखंडे, सुरज महादेव लोखंडे, रा. सरमकुंडी, ता. वाशी हे दोघे पिता- पुत्र नाका- तोंडास मास्क न लावता एकाच  मो.सा. वर बसून जात होते. पालीसांनी त्यांना हटकले असता त्या दोघांनी पोलीस पथकास उध्दटपनाची, अरेरावीची भाषा वापरुन कारवाई करण्यास पोलीसांना विरोध केला. त्या दोघांना पोलीस ठाणे येथे आणले असता त्यांनी व्यक्तीगत मोबाईल कॅमेऱ्याद्वारे पोलीस ठाण्यातील अंतर्गत भाग, कागदपत्रे इत्यादीं प्रतिबंधीत भागाचे ध्वनीचित्र मुद्रण करुन शासकीय गुपीते अधिनियमाचा भंग केला. यावरुन पोना- विक्रम नाईक यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमुद पिता- पुत्र विरुध्द भा.दं.वि. कलम- 353, 188 सह, म.पो.का. कलम- 120 सह, शासकीय गुपीते अधिनियम कलम- 3 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 
Top