तुळजापुर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आराध्य दैवत असलेल्या श्री कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेस कंकणाकृती सुर्यग्रहणाच्या पार्श्वभूमीवर रविवार दि.२१ जून रोजी पहाटे ५ वाजता श्री देवीजीचे चरण तिर्थ होऊन सकाळी ६ वाजता श्री देवीजीस पंचामृत दुग्धा अभिषेक घालुन श्री देवीजीस वस्ञोअलंकार पुजा करवुन दुपारती करण्यात आली. त्यानंतर सुर्य ग्रहणाचे वेध लागताच कंकणा सुर्य ग्रहणाच्या पार्श्वभूमीवर येथील श्री गोमुख तिर्थ कुंडाच्या पविञ जलाशयाने श्री देवीजीस स्नान घालुन पाढंरे शुभ्र वस्ञ परिधान करुन सकाळी १०/८ मि.पासुन ते दुपारी १/३७ पर्यत सोवळ्यात ठेवण्यात आले.
या सुर्य ग्रहण काळात मंञोपचार पुजा सुरु होते. तसेच राज्यावरील कोरोना चे संकट दुर व्हावे असे साकडे श्री तुळजाभवानी मातेच्याचरणी मंदीरातील पुजा-यांनी घातले. दुपारी सुर्य ग्रहण संपल्यानंतर श्री तुळजाभवानी मातेचे परत एकदा पंचामृत दुग्धा अभिषेक पुजा करुन वस्ञोअलंकार चढविण्यात येवुन दुपारती होवुन आरती करण्यात आली.
या वेळी श्री तुळजाभवानी मातेचे मुख्य महंत तुकोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, श्री तुळजाभवानी मातेचे मुख्य पाळीचे भोपे पुजारी मुन्ना भैय्ये (कदम), श्री तुळजा भवानी मंदीर संस्थानचे धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले आदीसह पाळीकर पुजारी, श्री देवीजीचे सेवेदारी उपस्थित होते.
