तुळजापुर : कुमार नाईकवाडी

 सध्या देशात केद्रं शासनाने केलेली मोठ्या प्रमाणात पेट्रोल, डिझेल दरवाढ रोखण्यात यावी, अशा प्रकारचे एक लेखी निवेदन तुळजापुर तालुका रा.काँ.वतीने दि.२३ मंगळवार रोजी तुळजापुर येथील तहसीलदार यांना देण्यात आले.

तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटंले आहे की, सध्या संपुर्ण जगभरात कोवीड १९ (कोरोना) या संसर्गजन्य रोगाने प्रचंड प्रमाणात थैमान घातले आहे. गेल्या तीन माहिन्यापासुन संबध भारत देशात लाँकडाऊन बंद होता. याचा परिणाम देशाच्या अर्थकारणावर व लोकांच्या उत्पन्नावर झाला आहे. परिणामी संपुर्ण देशातील जनता अर्थ कारणामुळे हैराण झाली आहे. सध्याची पेट्रोल,डिझेल दरवाढ ही लोकांना न परवडणारी आहे पेट्रोल डिझेल दरवाढीचे परिणाम तमाम जनतेला भोगावे लागत आहे. तरी केंद्र सरकारने केलेली दरवाढ त्वरीत थांबवावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने येणाऱ्या काळात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 या निवेदनावर रा.काँ.चे गोकुळ शिंदे, धैर्यशील पाटील, शफी शेख, भारत रोचकरी, शञगुन पवार, बबन गावडे, खंडु जाधव, धनंजय पाटील, अभय माने आदीसह रा.काँ.च्या कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरी आहेत.
 
Top