उस्मानाबाद : सालासर कृषी ॲग्रो, पिपलीया मंडी, मल्हार गड मंदसौर, मध्यप्रदेश येथील कंपनीच्या संचालक व उत्पादन- व्यवस्थापक यांनी त्यांचे सोयाबीन जेएस 335 बियाणे महाराष्ट्र शासन- कृषी विभागाची परवानगी न घेता श्रीनीवास कृषी सेवा केंद्राचे व्यवस्थापक, नेहा नवनाथ भोईटे यांना व विजय शशिकांत सावंत, कृष्णाई शेती विकास केंद्र, तेर यांना विक्रीस पुरवील्या. या पैकी नेहा भोईटे यांनी दुकानाचा बियाणे विक्रीचा परवाना नुतणीकरण केले नसतांनाही नुतणीकरण केल्याचे भासवून खरेदी केलेल्या नमूद सोयाबीन बियाण्यांच्या 35 पिशव्या तर, विजय सावंत यांनी 152 बियाणे पिशव्या शेतकऱ्यांना विक्री केल्या. अशा प्रकारे संबंधीतांनी शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक केली आहे. अशा मजकुराच्या श्री. बापु राउत, कृषी अधिकारी तथा बियाणे निरीक्षक, उस्मानाबाद यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन संबंधीतांविरुध्द भा.दं.वि. कलम- 420, सह बियाणे कायदा व बियाणे नियंत्रण आदेश अन्वये पो.ठा. आनंदनगर येथे गुन्हा दि. 22.06.2020 रोजी नोंदवला आहे.
 
Top