जळकोट, दि. २३ : मेघराज किलजे 

सध्या संपूर्ण देशात कोरोना विषाणू मोठ्या प्रमाणात पसरला असून त्यासाठी मौजे खुदावाडी येथील नागरिकांनमध्ये जी कोरोनाची भीती आहे. त्यावर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, मास्क, सॅनिटायजर, सोशल डिस्टन्स, सार्वजनणीक ठिकाणी थुकू नये, यासारखे अनेक उपाय योजना या जनजागृती अभियानांतर्गत वासुदेवाच्या व पोतराजाच्या वेशभूषेत कोरोना जनजागृती तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील जय मल्हार पत्रकार संघाच्या वतीने संपूर्ण गावात प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली. 

भारतीय संस्कृतीचा वारसा जपत  वासुदेवाच्या भूमिकेत पत्रकार श्री. दयानंद काळुंके यांनी कोरोनाची गाणी व घोषवाक्यांच्या म्हणीतून कोरोना जनजागृती केली. त्यामध्ये जय मल्हार पत्रकार संघ  सर्व पत्रकार  उपस्थित होते. त्यावेळी गावचे समाजसेवक डॉ . सिद्रामप्पा खजुरे ,डॉ जितेंद्र कानडे ,वैद्यकीय अधिकारी अविनाश गायकवाड, उपसरपंच  पांडुरंग बोंगरगे, माजी सरपंच  रेवणसिद्ध स्वामी, तंटामुक्त अध्यक्ष  शिवाप्पा जवळगे, पोलीस पाटील बसवराज सांगवे, चेअरमन  तुकाराम बोंगरगे, ग्रा .प. सदस्य शेकाप्पा सालगे, महादेव सालगे, वसंत  कबाडे, संतोष सांगवे, राम जवळगे, शिवपुत्र कबाडे, वसंत सालगे, पत्रकार  सतीश राठोड, प्रकाश गायकवाड, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, ग्रा. प .कर्मचारी व गावातील नागरिक व महिला या कोरोना जनजागृती अभियानात सहभागी झाले होते. 

 
Top