खानापूर : बालाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील खानापूर येथील उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे माजी जि.प.सदस्य वसंत वडगावे यांच्या वाढदिवसानिम्मित मित्रपरिवाराच्या वतीने उद्या शुक्रवार दिनांक १९ जून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्या देशात कोरोनाच्या भीषण परिस्थितीमुळे रक्ताचा तुटवडा भासत आहे याची दखल घेऊन माजी जि.प.सदस्य वसंतराव वडगावे यांनी वाढदिवसानिम्मित होणारा अनावश्यक खर्च न करता रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातल्याने कोरोना बाधित रुग्णांना व इतर रुग्णांना रक्ताची खूप टंचाई भासत असल्याने रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तपेढीमध्ये रक्तसाठा अत्यल्प प्रमाणात असल्याने मोठ्या प्रमाणात रक्ताची टंचाई भासत आहे.यामुळे रुग्णांना सध्या रक्ताची अत्यंत गरज आहे . यासाठी रक्तदान शिबीराचे आयोजन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.सध्या रक्ताची गरज भासत आहे तरी युवावर्गांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याची गरज आहे . ज्या रक्तदात्यास रक्तदान करायचे आहे त्यांनी आपली नावनोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.