तुळजापुर : कुमार नाईकवाडी

येथील नगरपरिषदची विशेष सर्वसाधारण सभा दि.८ सोमवार रोजी तुळजापुर चे नगरपरिषद चे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभा संपन्न झाली.सदर सभेमध्ये एकुण दहा विषय चर्चेसाठी ठेवण्यात आले होते.या सर्व विषयावर सर्वानुमते चर्चा होऊन सभा पार पाडण्यात आली. यामध्ये नगरपरिषदची मालकीची कोरोना प्रादुर्भाव असल्यामुळे दुकाने गाळे बंद असल्याने दुकान भाडे माफ करणे याबाबत सविस्तर चर्चा सभागृहात पार पडली.

सभागृहात नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी सांगितले की, कोरोना चा प्रादुर्भाव असल्यामुळे सदर काळात नगर परिषद मालकीची दुकान गाळे बंद असल्यामुळे शहरातील सर्व दुकानदाराचे एप्रिल, में जुन या कालवधीतील तीन माहिन्याचे भाडे माफ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्याचे सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे.तुळजापुर शहरामध्ये अद्यावत आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्या बाबत सविस्तर चर्चा होवुन  आठवडा बाजार येथील अद्यावत धर्मशाळा आरोग्य सेवा करुन देण्या बाबत शासनाचा अभिप्राय व समंतीने पुढील कार्यवाही करणे बाबत चा ठराव बहुमताने पारीत झाला. 

इतर विषयावर सविस्तर चर्चा झाली. या मध्ये रोजगार हमी योजने अंतर्गत कामे निवड करणे, जुने बसस्थानक पाठीमागील पाण्याची टाकी  परिसर व सुलभ शौचालय समोर परिसरात दुचाकी वाहनतळ उभे करणे,प्रधानमंञी अवास योजने अंतर्गत व रमाई अवास योजने अंतर्गत भोगवाट धारक यांना घरकुल मंजुर झाले असुन त्याचा प्रस्ताव भुमी अभिलेख कार्यालय यांच्या कडे नोंद करण्या बाबतीत शिफारस करण्यासाठी सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.तसेच येथील छञपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणी व सुशोभिकरण करण्याच्या दृष्टीने शहरवाशियांच्या मागणी संदर्भात कार्यवाही करणे, कमी मुळ अंदाजपञका व्यक्तीरिक्त होणाऱ्या  व इतर सर्व खर्चासहीत सभागृहाने एकमताने मंजुरी दिली या विशेष सर्वसाधारण सभा बैठकीस मुख्याधिकारी आशिष लोकरे आदीसह एकुण १४ न.प.सदस्य कार्यालय अधिक्षक व्ही व्ही पाठक,एस आर सोनार व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते शेवटी उपस्थीतांचे आभार मानुन विशेष सर्वसाधारण सभा संपन्न झाली.
 
Top