नळदुर्ग : कोरोनापासून वाचण्यासाठी शासनाने नियम ठरवून दिलेले नियम पाळायचे आहेत ज्यामध्ये मास्क वापरणे अनिवार्य आहे तसेच सॅनिटायझरचे वापर नियमित करावे असे आवाहन युवा मोर्चाच्या वतीने केले
नळदुर्ग शहर भाजपा युवा मोर्चाच्या वतीने कोरोना बाबत जनजागृती करत तुळजापूर विधानसभेचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून , आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग शहर भाजपा युवामोर्चाचे शहराध्यक्ष श्रमिक पोतदार यांच्या वतीने मास्क, सॅनिटायझर आणि जनजागृतीच्या पत्रकाचे वाटप पत्रकार विलास येडगे, श्रमिक पोतदार, कैलास घाटे, विशाल डुकरे, मयूर महाबोले यांच्या हस्ते करण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून अजीम प्रेमजी यांच्या विप्रो कंपनीचे स्वदेशी बनावटीचे सॅनिटायझर खरेदी करून स्वदेशीचा तसेच व्यास नगर येथील महिलांकडून बनवले गेलेले मास्क विकत घेत गृह उद्योगला प्रोत्साहन देण्यात आले.