तुळजापुर : कुमार नाईकवाडी

 शहरातील आर्य चौक भागात दि.२७ शनिवारी सायंकाळी कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने तो भाग प्रशासनाच्या वतीने तातडीने सील करण्यात आला होता. आर्य चौक येथील कांही भाग प्रभाग क्रं चार हा कंन्टेमेंट झोन मध्ये आल्याने प्रभाग क्रं चार च्या नगरसेविका अर्पणा नागेश नाईक यांनी त्या भागातील राहणाऱ्या नागरीकांना आषाढी एकादशी पार्श्वभूमीवर दि.२९ सोमवार रोजी घरो घरी फराळाचे साहित्य वाटप केले. या मध्ये भगर,शाबुदाना,शेगंदाने पेंड खजुर आदीसह साहित्य प्रत्येक घरा मध्ये उद्दात हेतुने वाटप करण्यात आले. या वेळी नागेश नाईक, अनंत बुरांडे, न.प.अधिकारी अभंग गायकवाड, रवि मस्के, अंजीराम जानकर आदी उपस्थित होते.
 
Top