काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे शनिवार दि.25 रोजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत येथील कोरोना आणि आषाढ अमावस्या ते श्रावण नागपंचमी निमित्त सुरू असलेल्या जागृत देवस्थान नागनाथ महाराज यात्रेचे औचित्य साधून येथील जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील यांच्या पुढाकारातून सलग तिसऱ्या वर्षी सोशल डिस्टंन्सिंगचे नियोजनबद्ध पालन करीत भव्य रक्तदान शिबिरात 151 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा तुळजापूर पंचायत समितीचे माजी सभापती संतोष बोबडे, सरपंच रामेश्वर तोडकरी, उपसरपंच आनंद बोबडे, माजी चेअरमन अरविंद भडंगे यांच्या हस्ते या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
यंदा कोरोना वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन येथील स्थानिक पदाधिकारी, यात्रा कमिटीने सावरगावसह पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेली येथील नागोबा यात्रा कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर रद्द करण्यात आली. परंतु येथील जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील यांनी सलग तिसऱ्या वर्षी पुढाकार घेऊन कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भावामुळे रक्ताचा तुटवडा भासू नये या हेतूने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दर्शवत 151 रक्तदात्यांनी शासकीय नियमांचे पालन करीत स्वेच्छेने रक्तदान केले.यावेळी अक्षय ब्लड बॅंकेच्या वतीने प्रमाणपत्र तर जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील यांच्या वतीने वैयक्तिक पाण्याचे जार किंवा हेल्मेट आणि अल्पोहाराचे वाटप करण्यात आले.
भविष्यातही करणार रक्तदान शिबिराचे आयोजन
भविष्यातही सावरगाव यात्रेनिमित्त रक्तदान शिबीर भरवून राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवणार असल्याचे आयोजक राजकुमार पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगून तरुणांनी कोरोनाला हरविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्र्वभूमीवर लॉकडाऊन असतानाही 151 रक्तदात्यांनी घराबाहेर पडण्याचे धाडस दाखवले त्याबद्दल आयोजक राजकुमार पाटील यांनी रक्तदात्यांचे आभार मानले.
यावेळी आयोजक जिल्हा परिषद सदस्य श्री राजकुमार पाटील,सरपंच रामेश्वर तोडकरी , माजी जिल्हा परिषद सदस्य तथा तुळजापूर पंचायत समितीचे माजी सभापती संतोष बोबडे, उपसरपंच आनंद बोबडे सोसायटीचे चेअरमन अरविंद भडंगे, आरोग्य अधिकारी बाचपल्ले,नेताजी कदम, अतुल पवार,चेअरमन सोमा तोडकरी,सुरेश रुपनर, राजू शिंदे,लक्ष्मण डोके, धर्मराज शिंदे, गणेश फंड, सुनील शिंदे,महिपती ताटे, तानाजी काळदाते, नंदू माळी, गणेश भालेकर,धर्मराज रुपनर,भगवान लिगंफोडे, महेश तानवडे,जितू पाटील, दता अण्णा लिगंफोडे, नेताजी कदम,बापू माने, जगु माळी, शाहू माळी,सिध्दु बंडगर, रणजीत पाटील नितीन रुपनर आदी मान्यवर उपस्थित होते. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी अक्षय ब्लड बॅंकैच्या कर्मचाऱ्यांसह येथील क्रांती नवरात्र तरुण मंडळ,संत सावता माळी तरुण मंडळ, राजे ग्रुप,आजोबा गणपती मित्र मंडळ, धर्मवीर संभाजी राजे ग्रुप, राजमाता ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.