उस्मानाबाद,दि.2 :- सध्या राज्यभरात कोव्हीड-19 प्रादूर्भावामुळे स्थलांतरीत कामगारांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक कारखाने, कंपन्यांना आवश्यक मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर कमतरता भासत आहे.    

          तसेच सद्यःस्थितीत उस्मानाबाद जिल्ह्यात स्वगावी स्थलांतरीत झालेल्या नोकर, कामगार, मजूर वर्गाचा रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, उस्मानाबाद यांनी खाजगी क्षेत्रातील नामांकित प्रतिथयश उद्योजक, कंपनी यांच्याकडील 231 पदे भरण्यासाठी पात्र व इच्छूक पुरुष व स्त्री उमेदवारांच्या ऑनलाईन पध्दतीने (स्काईप / व्हॉटसअप) माध्यमातून मुलाखती  घेऊन निवड प्रकिया करणार आहेत.

          या ऑनलाईन मेळाव्यात सहभागी होण्यासाठी  पात्र उमेदवारांनी दिनांक 6 जुलै, 2020 ते 10 जुलै, 2020 पर्यंत उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करु शकतील. त्यानंतर संबधित उद्योजक, कपंन्याकडून मुलाखती, निवड याबद्दल उमेदवारास वेळोवेळी कळविण्यात येऊन पुढील प्रकिया करण्यात येईल.

            कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभागाच्या https://mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जॉब सिकर रजिस्ट्रेशन (एम्प्लॉयमेंट) करुन आपल्या प्रोफाईल मध्ये शैक्षणिक पात्रतेची नोंद करणे अनिवार्य आहे. वैयक्तिक माहिती शैक्षणिक पात्रतेचा तपशील मोबाईल, ई-मेल, पत्ता अद्यावत करावा. त्यानंतर मेळाव्यात ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढीलप्रमाणे स्टेप्स कराव्यात.

Jobseeker Login > Enter Aadhar Id/ Registration Id > My Profile > Pandit Dindayal Upadhyay Job Fair> District Select> osmanabad > Click Vacancy Listing > मधून दिसणाऱ्या रिक्त पदानुसार आपल्या शैक्षणिक पातत्रेनुसार पात्र असलेल्या पदासाठी अप्लाय करावे. या ऑनलाईन मेळाव्यातील सहभागी उद्योजक, कंपनी 1) बालाजी अमायंन्स तामलवाडी  ता . तुळजापूर,  २) नॅचरल शुगर, रांजणी, ता.कळंब, ३) आलमप्रभू गारमेंन्ट, भूम, ४) स्वामी अॅग्रो, उस्मानाबाद,                  ५) एसआयएस, पुणे यांचे प्रतिनिधी व्हीडीओ कॉन्फरस, स्काईप, व्हॉटसॲप द्वारे पात्र उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेणार आहेत.

          तसेच कॅन्टीन, निवास ,ट्रान्सपोर्टेशन इ.सुविधा याबाबत संबंधित कंपनीच्या नियमानुसार ऑनलाईन, फोनकॉल करुन मुलाखतीच्या वेळी कंपनीचे प्रतिनिधी सविस्तर माहिती  व मार्गदर्शन करतील. या ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी  जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी  सहभागी  व्हावे. याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, उस्मानाबाद या कार्यालयाच्या दूरध्वनी  क्र. 02472-222236 वर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र, उस्मानाबाद यांनी केले आहे.

 
Top