उस्मानाबाद : आंबेजवळगा तांडा, ता. उस्मानाबाद येथील सचिन सखाराम राठोड हा खोटा नोंदणी क्रमांक असलेली होंडा शाईन मोटारसायकल वापरत आहे. अशी गोपनीय माहिती स्था.गु.शा. च्या पोनि- श्री दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखालील पोउपनि- श्री. आण्णाराव खोडेवाड, पोहेकॉ- रोकडे, पोकॉ- दिपक लाव्हरेपाटील, पांडुरंग सावंत, महिला पोकॉ- सोनवणे यांच्या पथकास मिळाली होती. यावर पथकाने आज दि. 28.07.2020 रोजी सचिन राठोड यास होंडा शाईन मोटारसायकलसह ताब्यात घेतले. या मो.सा. चा नोंदणी क्रमांक, मालकी- ताबा या विषयी तो पोलीसांना समाधानकारक माहिती देत नव्हता.
पथकाने त्या मो.सा. चा चासी- इंजीन क्रमांकाच्या आधारे ऑनलाईन शोध घेतला असता त्या मो.सा. चा नोंदणी क्र. खोटा असल्याचे आढळले. तसेच त्या मो.सा. चा खरा नोंदणी क्र. एम.एच. 13 बीएल 4796 असल्याचे व ती चोरीस गेल्याने विनायक मधुकर दंतकाळे, रा. म्हाडानगर, सोलापूर यांनी सोलापूर शहरातील एमआयडीसी पो.ठा. येथे गु.र.क्र. 451/ 2017 नुसार गुन्हा नोंदवल्याचे समजले. पथकाने ती मोटारसायकल जप्त करुन उर्वरीत कारवाईस्त सचिन सखाराम राठोड यास पो.ठा. उस्मानाबाद (ग्रा.) च्या ताब्यात दिले असुन उर्वरीत तपासकामी सोलापूर शहर पोलीसांचे सहकार्य घेतले जाणार आहे.