नळदुर्ग: 

 

विवाह सोहळ्याच्या आयोजनास जिल्हा प्रशासनाची परवानगी व व्यक्तींची संख्या निश्चीती- बंधनकारक करण्यात आली आहे. याचे उल्लंघन करुन मुबारक चॉद इनामदार, वय 37 वर्षे, रा. उमरगा (चि.), ता. तुळजापूर यांनी दि. 27.06.2020 रोजी दुपारी 09.00 वा. मौजे उमरगा (चि.) येथे विवाह सोहळ्याचे आयोजन केले. तसेच सोहळ्यात उपस्थितांची गर्दी निर्माण करुन कोविड- 19 आजाराच्या संसर्गाची शक्यता निर्माण केली. यावरुन ग्रामसेवक- श्री गोरोबा भिमा गायकवाड यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुबारक इनामदार यांच्याविरुध्द पो.ठा. नळदुर्ग येथे दि. 27.07.2020 रोजी गुन्हा नोंदवला आहे.

 
Top