उस्मानाबाद, दि. 1  : 

दि.1 जुलै, 2020 ते 15 जुलै 2020 या कालावधीत वृक्ष लागवड पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने वृक्ष लागवड करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उस्मानाबाद येथे     दि. 25 जून, 2020 रोजी श्रमदान करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय, वनविभाग, तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे कर्मचारी व विद्यार्थ्यांनी महाश्रमदानातून 446 खड्डयाचे खोदकाम करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे, अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, विभागीय वन अधिकारी एम.आर.गायकर, जिल्हा समन्वय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) महेंद्रकुमार कांबळे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार गणेश माळी, सर्व नायब तहसीलदार उपस्थित होते.

 
Top