नळदुर्ग, दि. 01 : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग व जळकोट येथील डॉक्टरांचा बुधवार दि. 1 जुलै रोजी जागतिक डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून लोकमंगल मल्टिस्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या नळदुर्ग व जळकोट शाखेच्यावतीने शुभेच्छा पत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. 

कोरोना संसर्गजन्य रोगाच्या संकटात सर्वच डाँक्टर हे रूग्ण सेवेच्या माध्यमातून खरे हिरो ठरले असून डाँक्टर वर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लोकमंगल मल्टिस्टेट कोआँपरेटिव्ह सोसायटी नळदुर्ग व जळकोट शाखेच्या वतीने वैद्यकीय सेवा देणाऱ्या डाँक्टर्सचा सत्कार करण्यात आला. 
 नळदुर्ग येथील डाँ.जितेंद्र पाटील, डाँ. जे.बी वडणे, डाँ. यशवंत नरवडे, डाँ. मंगरूळे, डाँ. महेश शिंदे यांचा तर जळकोट येथील  डॉ. एस.डी.कदम,  डॉ. आमोल शिंदे, डॉ एम.एस. मोजगे,  प्राथमिक आरोग्य केंद्र जळकोट येथील डॉ. एडके यांचा तर यांचा पुष्पगुच्छ व शुभेच्छा पञ देऊन सत्कार करण्यात आला. जळकोट येथील शाखाधिकारी गजानन कुलकर्णी, नळदुर्ग येथील शाखाधिकारी मारूती काळे, रोखपाल कैलास घाटे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सर्व डाँक्टर्सचा यथोचित सत्कार केला.

 
Top