नळदुर्ग, दि. 01 : कोरोना विषाणूची भीती दूर व्हावी , कोरोनावर मात करून परत आलेल्या लोकांना तिरस्काराची वागणूक मिळू नये तसेच त्यांच्या मनात स्वतःविषयी हिन भावना निर्माण होऊ नये व त्यांचे मनोबल वाढावे म्हणून नळदुर्ग शहरवासीयांच्या वतीने कोरोनाशी यशस्वीपणे लढा देऊन उपचारानंतर कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांचे 30 जून रोजी शहरात आगमन होताच शहरवासीयांच्या वतीने त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर त्यांचे पुष्पहार घालून सत्कार करण्यात आले.
यावेळी हाफेज सय्यद नियामतुल्ला इनामदार, हाफेज फुरखान अहेमद नक्शबंदी, पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव, शिवाजी नाईक, लतीफ शेख, उत्तम बनजगोळे, अमर भाळे, अलीम शेख, समीर बाडेवाले, रिझवान काझी, अॅड. सिराज जाहगीरदार, फझील सिद्दिकी, फैसल रिझवी, गौस इनामदार, मुतालिब शेख, दस्तगीर जाहगीरदार, रिजवान शेख, इरफान जाहगीरदार, मुदस्सर जाहगीरदार, खालेद इनामदार, सरदार सय्यद, अझीम काजी, हजरत शेख, वदुद मोजन, असीम जाहगीरदार, वसीम काजी,शहेबाज शेख, अजीज शेख, सफदर जाहगीरदार, आसिफ बागवान, मिनाज काझी यांच्यासह इत्यादी जण उपस्थित होते.