नळदुर्ग, दि. 01 : वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन  करू नये अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांनी  प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात केले आहे. 

नळदुर्ग शहर व पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही वाहन चालक विना नंबरप्लेट गाड्यांचा वापर करीत आहेत त्याच बरोबर  क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत कायद्याची पायमल्ली करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.तसेच काही वाहनचालक सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर अडथळा होईल अशाप्रकारे आपली वाहने लावत आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.त्यामुळे पुढील काळात नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या वतीने अशा बेजबाबदार वाहनधारकांच्या विरोधात विशेष मोहीम उघडून मोटार वाहन अधिनियम कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. तरी वाहनधारकांनी आपल्या वाहनास तात्काळ नंबरप्लेट बसवून घ्यावी तसेच स्वतःचे गाडीचे कागदपत्र सोबत ठेवावे त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने केलेल्या सूचनेचे पालन करावे अन्यथा यापुढे अशा वाहन जप्तीची किंवा वाहन चालकावर  दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांनी दिला आहे.

 
Top