उस्मानाबाद, दि. 01 : वसंतराव नाईक हरीत महाराष्ट्र अभियान- 2020 अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणी व पोलीस विभागाच्या कार्यालयांतर्गत वृक्षारोपन करण्यात येत आहे. त्यास अनुसरुन आज दि. 01.07.2020 रोजी उस्मानाबाद पोलीस मुख्यालय व पोलीस वसाहत परिसरात मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. या प्रसंगी राखीव पोलीस निरीक्षक श्री. शांताराम वाघमोडे मोटार परिवहन विभागाचे पोउपनि श्री. अंबर निंबाळकरयांसह अन्य पोलीस अधिकारी- कर्मचारी हजर होते.